मुंबई : आज मीडियाशी बोलताना संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. होळीच्या पाश्वर्भूमीवर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नकली रंग उधळतोय असे म्हणत भाजपवर खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच संजय राऊत म्हणाले, “भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे”. असे बोलत संजय राऊतांनी आपले मत व्यक्त केले.
‘भाजपमधील आमचे मित्रं रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर केंद्रीची बंदी आहे. काल त्यांना पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी महाराष्ट्रात भाजप येणार नाही’, असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

