🕒 1 min read
मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. नुकतंच या चित्रपटावर होणाऱ्या वादावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काही दिवसांपासून ‘झुंड’, ‘कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांवरुन वाद सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना नागराज मंजुळे म्हणाले, “एखादा चित्रपट प्रदर्शित झालाय. तो पाहा आणि मग त्यावर विचार करा. कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद सुरु आहे. या वादाला काहीही अर्थ नाही. तुमच्या जीवनात जर त्याचा काही परिणाम झाला तर चांगलचं आहे. दिग्दर्शक त्याच्या घरी असणार आहे. पण तुम्ही चित्रपटगृहाबाहेर अशी हाणामारी करणे योग्य नाही.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
