Share

IPL 2022 : “मला पाहायचं होतं की…”, स्वत: राहुलनंच सांगितलं पंजाब किंग्जपासून वेगळं होण्याचं कारण!

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या २०२२ हंगामासाठी फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली, तेव्हा अनेकांना केएल राहुलच्या निर्णयाने धक्का बसला होता. राहुलने पंजाब किंग्जपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता तो लखनऊ सुपरजायंट्स या नव्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मेगा लिलावापूर्वी लखनऊने त्याला संघाशी जोडले होते. पंजाब किंग्जमधून राहुल का बाहेर पडला, याचे कारण स्वत: राहुलनेच सांगितले आहे.

रवीचंद्रन अश्विन बाहेर पडल्यानंतर राहुलने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आणि भरपूर धावा केल्या, पण तो आपल्या कर्णधारपदावर छाप पाडू शकला नाही. राहुलने संघात राहावे अशी पंजाबची इच्छा असली तरी त्याने संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

रेडबुल क्रिकेटवर चर्चा करताना राहुल म्हणाला, ”हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप कठीण होते पण मला आणखी काय साध्य करायचे आहे हे जाणून घ्यायचे होते. मी त्यांच्यासोबत चार वर्षे होतो आणि मी चांगला वेळ घालवला. माझ्यासाठी आणखी काय शिल्लक आहे, किंवा माझ्यासाठी एक नवीन प्रवास आहे का? हे मला पाहायचे होते. हा निश्चितच कठीण निर्णय होता.”

जेव्हा आयपीएल रिटेन्शन लिस्ट जाहीर झाली, तेव्हा पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले होते, की संघाला राहुल त्यांच्यासोबत हवा होता, पण त्याने लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला होता. या मोसमात मयंक अग्रवाल पंजाबचा कर्णधार असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!