नवी दिल्ली: श्रीनगरचे ट्युलिप गार्डन (tulip garden to open soon) हे आशिया खंडातील सर्वात मोठे उद्यान सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आम्ही नऊ महिन्यांपासून काम करत आहोत आणि यावर्षी अधिक पर्यटकांची अपेक्षा आहे. असे जम्मू आणि काश्मीरचे फ्लोरिकल्चर विभाग आयुक्त शेख फयाज यांनी सांगितले आहे. ट्युलिप फुलांच्या बहरला बघण्यासाठी जगभरातील पर्यटक काश्मीर मध्ये पर्यटनाला येत असतात.
काश्मीरमध्ये नवीन हंगामाच्या प्रारंभासह आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन २३ मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. काश्मीरचे ट्यूलिप गार्डन जबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्यान ३० हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पर्यटन विभागाकडून प्रमोशन शोचे आयोजनदेखील केले जात आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा ट्युलिप गार्डनमध्ये अधिक ट्यूलिप्सची लागवड करण्यात आली आहे. यावेळी ट्युलिप गार्डनमध्ये किमान १५ लाख ट्यूलिप फुलांची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच बदाम, जर्दाळू, चेरीची विविध प्रकारची झाडेही येथे लावण्यात आली आहेत. एवढ्या फुलांनी इथले वातावरण पूर्णपणे गुलजार झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “… तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू”, अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर राऊतांचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : ‘त्याने मला फिनिशर कसे बनायचे सांगितले’; दिल्लीच्या स्टॉइनिसला चेन्नईच्या ‘थाला’ने दिले मास्टरक्लास
- “ममता बॅनर्जींच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना केंद्राने चणे-कुरमुरे वाटावेत अशी सुरक्षा…”, राऊतांचे टीकास्त्र
- धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
- “सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ…”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

