Share

IPL 2022 : ‘किंग कोहली’ स्पर्धेआधी आरसीबीच्या संघात सामील; चाहते सुखावले!

Published On: 

मुंबई: विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाशी कधी जोडला जाईल याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता आणि तो क्षण सोमवारी आला. तो आरसीबीच्या मुंबईतील शिबिरात सामील झाला. गेल्या नऊ मोसमात (२०१३-२१) फ्रँचायझीचे नेतृत्व केल्यानंतर, त्याने कर्णधारपद सोडले. अलीकडेच, RCB ने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसला आगामी हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) सोशल मीडियाने विराटच्या आगमनाची माहिती दिली. त्यांनी विराटचे (Virat kohli) फोटो पोस्ट करत खाली लिहले “किंग कोहली आला आहे, हीच बातमी आहे.” IPL 2022 ची सुरुवात २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या जाणार्‍या स्पर्धेने होणार आहे.

आरसीबीला अद्याप आयपीएल जिंकता आलेले नाही आणि यावर्षी फ्रँचायझी त्यांच्या विजेतेपदाचा दुष्काळ मोडू पाहतील. संघ २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. गेल्या मोसमात, आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता, परंतु फ्रँचायझी उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरली होती. २०२१ UAE लेग दरम्यान, कोहलीने घोषित केले होते की तो २०२२ च्या मोसमापासून फ्रँचायझीचे नेतृत्व करणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!