Share

IPL 2022 KKR vs RR : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्यांदा पराभूत; संजू सॅमसननं ‘यांच्यावर’ फोडलं पराभवाचं खापर!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ४७व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सला कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR vs RR) सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा १० सामन्यांमधला हा चौथा पराभव होता. ते आयपीएल २०२२च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.

सामन्यानंतर संजू सॅमसनने या पराभवासाठी आपल्या फलंदाजांना जबाबदार धरले. या खेळपट्टीवर संघाने १५-२० धावा कमी केल्या, त्यामुळे त्याचा फटका संघाला सहन करावा लागला, असे सॅमसनचे मत आहे. संजू सॅमसन म्हणाला, ”मला वाटतं विकेट थोडी संथ होती आणि केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. पण आमची फलंदाजी पाहता आम्हाला शेवटच्या षटकात आणखी काही चौकार मारण्याची गरज होती. मला वाटते की आम्ही १५-२० धावांनी मागे राहिलो.”

संजू सॅमसन हा आपल्या संघाचा स्टार परफॉर्मर होता, त्याने ४९ चेंडूत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. संजूही काही काळ अस्वस्थ दिसत होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मागील काही सामन्यांमध्ये मला वेदना होत होत्या, पण मी बरा होत आहे. माझे पाठीचे दुखणेही ठीक आहे.” सॅमसनने आपल्या संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, ”आम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली झुंज दिली. खेळाडूंची देहबोली आणि ऊर्जा अप्रतिम होती. मला वाटते की पुढच्या वेळीही आम्हाला चांगली फलंदाजी करून नाणेफेक जिंकण्याची गरज आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!