Share

IPL 2022 KKR vs DC : आपली बॅटिंग भारी आणि फिल्डींग लय भारी..! लॉर्ड ठाकूरनं घेतला रहाणेचा सुपरकॅच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा मुंबईकर खेळाडू शार्दुल ठाकूरने आयपीएल २०२२मध्ये चांगली कामगिरी केली आहे. ब्रेबॉर्न स़्टेडियमवर सुरू असलेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात शार्दुलने आतषबाजी फटकेबाजी केली, सोबतच क्षेत्ररक्षण करताना एक अफलातून झेलही टिपला.

शार्दुलने कोलकाताचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेचा झेल घेतला. खलील अहमदने टाकलेल्या सांघिक पाचव्या षटकात दबावात खेळणाऱ्या रहाणेने लॉंग ऑनच्या दिशेने उंच फटका खेळला, तेव्हा मिड ऑनवर उभ्या असलेल्या शार्दुलने पाठी धावत जात हा झेल घेतला.

या सामन्यात कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली, पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. सलामीवीर शॉ, वॉर्नर यांची अर्धशतके आणि शेवटी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीने कोलकाताला २१६ धावांचे आव्हान दिले. शार्दुलने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!