🕒 1 min read
मुंबई: २६ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या त्याच्या संघासह मुंबईत आहे. तर त्याची पत्नी संजना गणेशन न्यूझीलँडमध्ये आहे. संजना न्यूझीलँडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये अँकरिंग करत आहे. मुंबई इंडियन्सचे बहुतेक खेळाडू त्यांच्या साथीदारांसह बायो बबलमध्ये आहेत, परंतु बुमराहची पत्नी त्याच्यापासून लांब आहे. अशा परिस्थितीत बुमराह त्याच्या पत्नीलाही मिस करत आहे.
आपल्या बायकोच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या बुमराहने (jasprit bumrah) तिच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. ज्यात त्याने दोघांचा सुंदरसा हसतानाचा फोटो टाकत खाली लिहले , “प्लिज लवकर ये, इन्साईड्स जोक आपले हसू मिस करत आहेत” त्याच्या या पोस्टखाली संजनाने (sanjana ganeshan) ही कमेंट करत लिहले “पळतच घरी तुझ्याकडे येत आहे” नुकतेच या दोघांच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. गेल्यावर्षी १५ मार्चला या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
Come back soon please, the inside jokes miss our laughs.???? pic.twitter.com/YHw0D17qP9
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) March 22, 2022
आयपीएल २०२२ मध्ये, मुंबई इंडियन्स संघ पाचव्यांदा विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. बुमराहला फ्रँचायझीने मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले होते. लीगच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…साकारण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच, पण तो पूर्णत्वास कसा नेणार?”, संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022: मुंबईच्या पलटनसाठी मोठी बातमी; सूर्या पहिले काही सामने मुकणार!
- IPL 2022 : अरेरे..! स्पर्धेबाहेर गेलेल्या जेसन रॉयला मिळाली जबर शिक्षा!
- शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! शिवसंपर्क अभियानापूर्वी वर्ध्यातील विश्रामगृहात राडा
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
