मुंबई: IPL 2022 चा १५ वा सीझन सुरु झाला असून CSK चे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. यंदा महेंद्रसिंग धोनी एक खेळाडू म्हणून या स्पर्धेत खेळत आहे. त्याच्या जागी चेन्नई संघाची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. पण, यंदाचा सीझन सुरू होण्यापूर्वीच एमएस धोनीचे कर्णधारपद सोडल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, हा निर्णय अचानक नसल्याचा खुलासा स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे.
सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग (stephan fleming) यांनी सांगितले की, “आम्ही याबाबत २०२१ च्या आयपीएलवेळी बोललो. एमएसने माझ्याशी याबद्दल चर्चा केली होती. वेळेचा निर्णय त्यालाच घ्यावा लागणार होता.” धोनीने १२ हंगामात चेन्नईसाठी (csk) कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. यासह त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला ४ वेळा चॅम्पियन बनवले आहे. त्याच वेळी, सीएसके ५ वेळा उपविजेतेपदावर होता.
एवढेच नाही तर स्टीफन फ्लेमिंगने सांगितले की, धोनीकडून जडेजाकडे कर्णधार बदलणे खूप सोपे होते. याबाबत ते म्हणाले,“जडेजाला कोणत्याही दबावाशिवाय आयपीएलमध्ये संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एन श्रीनिवासन यांना टीममार्फत ही माहिती देण्यात आली. म्हणून आम्ही याबद्दल पूर्णपणे बोललो. कर्णधारपदात बदल करण्यात आला आहे. पण, हे काम चांगले झाले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून काँग्रेसचे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन- नाना पटोले
- “पवारांच्या हस्ते उदघाटन नको ही लोकभावना”- गोपीचंद पडळकर
- IPL 2022 : काय सुरुवात केलीय..! रोहितनं आपल्या दोस्तालाच ठोकला यावर्षीचा पहिला षटकार; पाहा VIDEO
- “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात..”, अजित पवारांचा दत्तात्रेय भरणे यांना टोला
- IPL 2022: ‘धोनी जडेजासारखी फलंदाजी करत होता आणि…’ ; सेहवागने घेतली चेन्नईच्या खेळाडूंची फिरकी


