पणजी: गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.
आज सकाळी 11 वाजता प्रमोद सावंत यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला होता. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं होतं. तसेच या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो होते.
महत्वाच्या बातम्या –
मधमाशी पालन व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात!
मविआ सरकारमधील तीन मंत्र्यांचा आज कोकणात ‘पॉलिटिकल शो’
“जाधवांनी पोच पावती, बिलं ही घेतले असेल?”, ‘त्या’ कारवाईवरून किरीट सोमय्यांची टीका
“आज देशात जे चित्र दिसत आहे, ते जर असंच राहिलं तर…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
“सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

