Share

IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना (Qualifier 1) लीग टप्प्यात पहिल्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स (GT vs RR ) यांच्यात रंगत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गुजरातने साखळी टप्प्यात सर्वोत्तम खेळ केला आणि त्यांनी १४ पैकी १० सामने जिंकले. तर राजस्थानने ९ सामन्यांत विजय मिळवला.

गुजरात टायटन्सने त्यांच्या एकत्रित कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि लीग टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. गरजेच्या वेळी वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिले आणि हेच या संघाच्या यशाचे रहस्य आहे. मात्र, आता चुकांना जागा नाही आणि त्यामुळेच संघाला कोणत्याही प्रकारची चूक करायला आवडणार नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने संघाचे यशस्वी नेतृत्व केले आणि दोन्ही विभागात योगदान दिले. पॉवरप्लेमध्ये झटपट धावा करून वेगवान सुरुवात करण्याचे काम वृद्धिमान साहाने केले आहे. मात्र, संघाला दुसरा सलामीवीर शुबमन गिलकडूनही योगदानाची अपेक्षा आहे. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी अनेक वेळा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. राशिद खान अष्टपैलू खेळ दाखवण्यात मागे राहिलेला नाही. मोहम्मद शमी आणि यश दयाल यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.

राजस्थान रॉयल्सने संपूर्ण लीग टप्प्यात बरेच सातत्य दाखवले आहे. लीग टप्प्यातील पहिल्या काही सामन्यांमध्ये जोस बटलरने चांगल्या धावा केल्या होत्या पण शेवटच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत आहे. मात्र, आज महत्त्वाच्या सामन्यात बटलर धावा करेल अशी संघाला पूर्ण आशा असेल. यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि पुनरागमन केल्यापासून त्याने चांगली फलंदाजी केली आहे. संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर यांनीही चांगले योगदान दिले आहे. दुसरीकडे रियान परागने गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी केली आहे. रवीचंद्रन अश्विनने संघासाठी अष्टपैलू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. युझवेंद्र चहल हा गोलंदाजीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय या त्रिकुटाने चांगली गोलंदाजी केली आहे.

दोन्ही संघांची Playing 11

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!