🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारले गेले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये विक्रमी एक हजार षटकारांची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंजाब किंग्जचा (PBKS) फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने या मोसमातील १०००वा षटकार ठोकला.
यापूर्वी आयपीएल २०१८ मध्ये ८७२ षटकार मारले होते. त्याच वेळी, आयपीएल २०१९ मध्ये ७८४ षटकार मारले गेले. याशिवाय २०१२च्या मोसमात ७३१ षटकार मारले होते. आयपीएलचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून लीगमध्ये हजार षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
#IPL2022 is the first season to witness 1000 sixes being hit. Here is the team-wise distribution. ???? pic.twitter.com/WfBj4GUAVL
— 100MB (@100MasterBlastr) May 23, 2022
पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात हा इतिहास रचला गेला. रोमारियो शेफर्ड पंजाब किंग्जच्या डावातील १५वे षटक टाकत होता. लियाम लिव्हिंगस्टोनने त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला. हा त्याचा सामन्यातील चौथा आणि आयपीएल २०२२ मधील १०००वा षटकार होता. लिव्हिंगस्टोनचा हा षटकार ९७ मीटर लांब होता. त्यानंतर चेंडू बदलावा लागला.
1000 sixes in IPL 2022 – first time in IPL history.
— Johns. (@CricCrazyJohns) May 22, 2022
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने ३७ षटकार ठोकले आहेत. त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत हा आकडा आणखी वाढू शकतो. बटलरनंतर लिव्हिंगस्टोनने या मोसमात सर्वाधिक ३४ षटकार ठोकले आहेत. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या मोसमात त्याने १४ सामन्यात ३२ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
