मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चे विजेतेपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज लढत होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. १५ वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. दुसऱ्या बाजूला दिग्गज संघांचा पराभव करत प्रथमच लीगमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन महिन्यांपूर्वी आयपीएलचा १५वा हंगाम सुरू झाला तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू मैदानावर उतरतील.
आयपीएलच्या मेघा लिलावात गुजरात संघ खेळाडू खरेदी करण्याच्या बाबतीत फ्लॉप ठरला अशी सर्वच स्तरातून टीका होत होती. मात्र आशिष नेहरा च्या मार्गदर्शनाखाली आणि हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात या संघाने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. गेल्या काही महिन्यात करिअरमधील चढ-उतार पाहिलेल्या हार्दिक पंड्या आणि आशीष नेहरा यांनी दोन महिन्यात गुजरात संघाला अव्वल स्थानी पोहोचवले.
मागील वर्षी शारजाह येथे खेळलेल्या एका सामन्यात राहुल तेवतियाने एकच षटकात ५ षटकार ठोकले होते मात्र त्यानंतर त्याच्या नावापुढे वन मॅच वंडर असा शिक्का लागला. परंतु यंदाच्या हंगामात राहुलने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरी झलक चाहत्यांना दाखवली. तर दुसरीकडे मागील ३-४ वर्षांपासून लय मिळविण्यासाठी धडपडत आसलेल्या डेव्हिड मिलरने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत गुजरातसाठी मॅचविनिंग कामगिरी केली. गुजरातसाठी राशिद खानने देखील फक्त गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीतही आपला रूबाब दाखवला. वृद्धिमान साहाच करिअर धोक्यात येण्याची शक्यता आसतना तो पुन्हा चांगला खेळत आहे.
Is #SundayMotivation a thing yet? ???? pic.twitter.com/l7zVpHfIfE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
राजस्थानचा संघलाही कमी लेखून चालणार नाही. कारण आयपीएलचे पहिले विजेतेपद त्यांनी वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. त्यानंतर ते प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. संजू आणि हार्दिक पंड्या यांच्या क्षमता सारखीच आहे. राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर सध्या वेगळ्याच दिमाखात फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. त्यांनी यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत ४ शतके ठोकली आहेत. या सामन्यात बटलर ची नजर वॉर्नर आणि कोहलीच्या धावांचा विक्रम मोडीत काढण्यावर असेल. संजूकडे आर अश्विन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्ड सारखे दिग्गज तर यशस्वी जयसवाल आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे युवा खेळाडू आहेत. संजूने या सर्वांना सोबत घेत संघाला इथपर्यंत आणले आहे. आज होणाऱ्या फायनल सामन्यात नवे हिरो देखील होतील आणि अनेक विक्रम देखील तयार होतील.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

