मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज अंतिम सामना (Final) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होईल़. सामन्यापूर्वी समारोप समारंभ (Closing Ceremony) होणार असल्याने रात्री आठ वाजल्यापासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएल २०२२चा समारोप समारंभ सुमारे ४५ मिनिटांचा असेल. २०१८ नंतर प्रथमच आयपीएलचा समारोप सोहळा होणार आहे. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्यामुळे समारोप किंवा उद्घाटन समारंभ झाला नव्हता. त्याच वेळी, २०२० आणि २०२१च्या हंगामात, कोरोना महामारीमुळे समारोप समारंभ पुढे ढकलावा लागला.
Capacity Crowd ?
…. Just bring it! ✊????⚡️⚡️⚡️
Tune in to watch me live performing at the Closing ceremony of Tata IPL Final 2022 on Star Sports & Disney+Hotstar today at 6.25 pm.#TATAIPL #TATAIPLFINAL @IPL pic.twitter.com/CX3nxXHk3f
— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 29, 2022
ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग या समारोपीय कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहेत. याशिवाय या सोहळ्यात झारखंडचा छऊ नृत्यप्रकारही सादर करण्यात येईल. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाचा ट्रेलरही अंतिम सामन्यादरम्यान पहिल्या डावातील दुसऱ्या स्ट्रॅटेजिक टाइमआऊट कालावधीत लाँच केला जाईल.
Excitement level ????
Stoked to be performing with @arrahman sir and gang for the IPL closing ceremony in Ahemdabad #IPLFinal #IPL2022 #GTvsRR pic.twitter.com/DohfFp3wLv— Neeti Mohan (@neetimohan18) May 28, 2022
प्रभात कुमार महतो यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय छऊ नृत्य पथक २४ मे रोजीच गुजरातला रवाना झाले होते. या संघाने भूतान, संयुक्त अरब अमिराती, चीन अशा अनेक देशांमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. या सहलीचा सर्व खर्च बीसीसीआय करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

