मुंबई: IPL 2022 चा दुसरा सामना २७ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या. यात दिल्लीच्या कर्णधार ऋषभ पंतने एक अजब निर्णय घेतला आहे. इतिहासात दुसऱ्यांदा संघात केवळ २ परदेशी खेळाडू आहेत.
दिल्लीने (MI vs DC) टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऋषभने (Rishabh pant) प्लेइंग इलेव्हन सांगितली ज्यात केवळ २ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमध्ये असा नियम आहे कि संघात जास्तीत जास्त ४ आणि कमीत कमी दोन परदेशी खेळाडू असावे. दिल्लीआधी २०११ मध्ये कोलकाताने असे केले होते. त्यांनी सुद्धा चेन्नई विरुद्ध सामन्यात केवळ २ परदेशी खेळाडू खेळवले होते. या सामन्यात दिल्लीने टीम सेफर्ट आणि रोवमन पॉवेल या दोन परदेशी खेळाडूंना खेळवले आहे.
दिल्लीची प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी
महत्वाच्या बातम्या
- MI vs DC : ह्याला म्हणतात दांडीगुल गोलंदाजी..! अश्विननं दिल्लीच्या बॅट्समनचा ‘असा’ काढला काटा!
- “राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”- सुजय विखे पाटील
- IPL 2022: मुंबईच्या पहिल्याच सामन्यात इशानची धुव्वादार बॅटिंग! दिल्लीच्या गोलंदाजांना पळवले
- IPL 2022 : इशान किशननं धुतलं..! मुंबई पलटणचं दिल्लीकरांना १७८ धावांचं आव्हान!
- “कोविड च्या नावावर भ्रष्टाचार…”- यशवंत जाधव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

