अहमदनगर: भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलत असतांना विखे पाटील म्हणाले की,‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत.
“महाविकास आघाडीच्या संसारात राष्ट्रवादी काँग्रेस हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी त्यांना कुणी काहीही म्हणत नाही. शिवसेना हि मुकी बायको आहे, तर काँग्रेस हे पत्रिका ना मिळालेले वऱ्हाडी आहेत, असा टोला विखे पाटील यांनी यावेळी सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:


