Share

IPL 2022: ‘हाथ मत छोडना साथ मत छोडना’ दिल्लीच्या विजयाचे हिरो अक्षर- ललितचा मजेशीर VIDEO पाहिलात का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिल्ली कॅपिटल्समध्ये मुंबई इंडियन्स आयपीएलमधील दुसरा सामना खेळला गेला. ज्यामध्ये दोन युवा खेळाडूंनी चाहत्यांच्या मनावर खोल छाप सोडली आहे. अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आता सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी अनेक मोठे खुलासे केले आणि त्यांनी ५ ओव्हरमध्ये ७५ धावा कशा बनवल्या हे देखील सांगितले.

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये छान संवाद होताना दिसत आहे. चर्चेदरम्यान अक्षर पटेल (akshar patel) आणि ललित यादव (lalit yadav) यांनी त्यांच्या रणनीतीबद्दल सांगितले, “काल तू मला सामन्याच्या आधी मला माझी भूमिका सांगितलीस. आमची योजना फक्त शेवटपर्यंत न्यावी अशी होती आणि आम्ही एकत्र खेळलो तर सामना जिंकू शकतो. त्यामुळे जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा तू मला म्हणालास, ‘हात सोडू नकोस, साथ सोडू नकोस.”

मुंबईच्या (MI) १७७ चा पाठलाग करताना अक्षर आणि ललित यांनी ५ ओव्हरमध्ये ७५ धावांची जलद भागीदारी केली. त्यामुळे संघाने हा सामना चार गडी राखून जिंकला. ललित यादवने ३८ चेंडूत नाबाद ४८ धावा करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर अक्षर पटेलही ३८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह दिल्लीने पहिला सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!