Share

“आम्हाला तुमचा अभिमान…”, वर्ल्डकपचं स्वप्न भंगलेल्या टीम इंडियासाठी विराट काय म्हणाला ते एकदा वाचाच!

Published On: 

मुंबई: रविवारी दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आता ICC महिला विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाच्या या पराभवानंतर चाहते ट्विटरवर टीमला खूप ट्रोल करत आहेत. चाहत्यांनी भारतीय बीसीसीआयवरही निशाणा साधला आहे. दरम्यान, भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्यांचे सांत्वन केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) सामन्यात भारतीय संघाला रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. वास्तविक, टीम इंडियाची गोलंदाज दीप्ती शर्माने (Dipti sharma) शेवटच्या षटकात नो बॉल टाकला, ज्यामुळे टीम इंडियाला आयसीसी महिला विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले.
संघाचे सांत्वन करत विराट कोहलीने (virat kohli) ट्विट केले, “तुम्ही जिंकण्याचे ध्येय ठेवलेल्या स्पर्धेतून बाहेर पडणे नेहमीच कठीण असते पण आमचा महिला संघ आपले डोके उंच ठेवू शकतो. तुम्ही तुमचे सर्वस्व दिले आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.”

रविवारी भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना केला. सामना जवळपास संपूर्णपणे टीम इंडियाच्या हातात होता, पण शेवटच्या ओव्हरच्या नो-बॉलने टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न भंगले. विजयासाठी २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात सात धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी तीन धावांची गरज असताना दीप्ती शर्माने डुप्रिजचा झेल टिपला. पण नंतर तिसर्‍या अंपायरने सांगितले की तो चेंडू नो बॉल होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी झाला. भारताच्या या पराभवामुळे विंडीज संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!