मुंबई : झी मराठी वाहिनीवर गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकरांचा हा शो झी मराठीचा आता अविभाज्य भाग म्हणून ओळखला जात आहे. होम मिनिस्टर मधून आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत देशभरातील वहिनींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता ह्या शोमध्ये अनेक मोठे बदल केले असल्याने या शोची उत्सुकता अधिक वाढलेली पाहायला मिळणार आहे. कारण आता गृहिणींना तब्बल एक दोन नव्हे तर चक्क ११ लाखांची पैठणी मिळवण्याची नामी संधी मिळणार आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचे एक विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाच नाव ‘महामिनिस्टर’ असं आहे.
या पर्वात ‘महामिनिस्टर’च्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. विजेत्या वहिनींना मिळेल महामिनिस्टरचा खिताब आणि ११ लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी. ११ लाखाच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसेल. त्यामुळे सर्व वहिनी या नवीन पर्वासाठी आणि महामिनिस्टरचा खिताब जिंकण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. तर महामिनिस्टर हे पर्व ११ एप्रिल पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
महत्वाच्या बातम्या :
काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाही- नितीन गडकरी
IPL 2022: पंजाब विरुद्ध पराभवानंतरही फाफ डु प्लेसिस आनंदित; फलंदाजीचे केले कौतुक
‘Oscar’ मधल्या विल स्मिथ प्रकारावरून नीतू कपूर म्हणाल्या, “महिला आपल्या भावनांना…”
मोठी बातमी! नवाब मलिकांच्या खात्यांचा कार्यभार ‘या’ मंत्र्यांकडे, ठाकरे सरकारचा निर्णय
“…तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल”, नाणार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

