Share

IPL 2022 : “मला आयपीएलमध्ये धोनीसारखं यश मिळवायचंय”, हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया!

Published On: 

मुंबई : आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्स आज आपला पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणाप आहे. तत्पूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने हंगामातील पहिल्या सामन्यापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कर्णधारपद ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे, पण लीगमध्ये मला महेंद्रसिंह धोनीसारखे यश मिळवायचे आहे”, असे हार्दिक म्हणाला.

आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सने १५ कोटी रुपयांना ड्राफ्ट केले होते. यानंतर त्याला संघाचा कर्णधारही नियुक्त करण्यात आले. हार्दिक यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या विजयी संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. मात्र, आता त्याला नवी जबाबदारी मिळाली आहे.

लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिकने गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना खास संदेश दिला आहे. संघाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “लेडीज अँड जंटलमन मी तुमचा कर्णधार हार्दिक पंड्या बोलतोय. ही भावना माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मैदानही नवीन आहे. मी तुम्हाला फक्त संघाला कुठे घेऊन जायचे ते सांगेन. मला संघाला शिखरावर घेऊन जायचे आहे, जे धोनीने केले आहे. मलाही त्याच्यासारखेच यश मिळवायचे आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!