मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज स्पर्धेचा ५०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद ९२ धावा आणि रोवमन पॉवेलच्या स्फोटक ६७ धावांच्या जोरावर दिल्लीने २०७ धावांचा डोंगर उभारला. पॉवेलने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत फटकेबाजी केली. हैदराबादकडून कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सीन एबॉट हे पदार्पणाचा सामना खेळत आहेत. तर दिल्लीने एनरिक नॉर्किया, मनदीप सिंग, रिपल पटेल आणि खलील अहमद आजचा सामना खेळत आहेत.
दिल्लीचा डाव
डेव्हिड वॉर्नरसह सलामीला आलेल्या मनदीप सिंगला हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर आलेले मिचेल मार्श (१०) आणि ऋषभ पंत (२६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मार्शला सीन एबॉटने तर पंतला श्रेयस गोपालने तंबूत पाठवले. वॉर्नरने एका बाजूने किल्ला लढवत अर्धशतक पूर्ण केले. स्फोटक फलंदाज रोवमन पॉवेलला १८ धावांवर विल्यमसनने जीवदान दिले. पॉवेलने १७व्या षटकात चांगली फटकेबाजी करत या जीवदानाचा फायदा उचलला. वॉर्नर-पॉवेल यांनी शतकी भागीदारी केली. २०व्या षटकात पॉवेलने उमरान मलिकला षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. या षटकात पॉवेलवने १९ धावा ठोकल्या आणि दिल्लीला दोनशेपार पोहोचवले. २० षटकात दिल्लीने ३ बाद २०७ धावा केल्या. वॉर्नरने ५८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ९२ तर पॉवेलने ३५ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६७ धावांची खेळी केली.
???????????????????????????? ????????????????????!
The stunning batting show from @davidwarner31 (92*) & Rovman Powell (67*) powers @DelhiCapitals to 207/3. ???? ????
The @SunRisers chase to begin soon. ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/0T96z8GzHj#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/ppoNlXjQFd
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2022
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

