Share

“राष्ट्रवादीचे भाड्याचे प्रवक्ते…”; संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सभांवर कोणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. ज्या  पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? तसेच त्यांचा विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं.” राऊतांच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देताना राऊतांवर घणाघात केला.

संदीप देशापांडे यांनी ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांची मानसिकता भाड्याची आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्यानं लावलं आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.  “राष्ट्रवादीचे भाड्याचे प्रवक्ते श्री लवंडे साहेब यांची मानसिकता भाड्याची असल्यामुळे त्यांनी स्वत:ला राष्ट्रवादीकडे भाड्याने लावले असावे,” असं देशपांडे यांचे ट्विट आहे.

तसेच संदीप देशपांडे यांनी संजय राऊत लवकरच आर्थर रोडमध्ये जातील असं सूचक वक्तव्य केलं. म्हणाले, “राज ठाकरेंचं हिंदुत्व नक्की कोणत्या प्रकारचं आहे, याचं संशोधन करावं त्यांनी. सध्या काम धंदे नाहीत त्यांना. आता आर्थर रोडला जातील, त्यानंतर एका रुममध्ये बसून संशोधनच करायचं आहे. त्यामुळे त्यांनी ते करत रहावं”, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

संजय राऊत असेही म्हणाले होते –

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राज ठाकरेंच्या मागे फरफट होतेय का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची फरफट कुठेच होऊ शकत नाही, खास करुन हिंदुत्वाच्या बाबतीत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत आहोत. पण आमची हिंदुत्वाची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व स्वीकारलं याबाबत संशोधन करावं लागेल.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!