Share

“मोहन भागवतांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा” ; प्रवीण तोगाडियांचा खोचक टोला

Published On: 

नागपूर : मोहन भागवत यांनी नुकतेच अखंड भारताच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. येत्या १५ ते २० वर्षात अखंड भारत निर्माण होऊ शकतो, असे मोहन भागवत म्हणाले होते. आता आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी मोहन भागवत याच वक्तव्याचवर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. “मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा,” असा खोचक टोला प्रवीण तोगडीया यांनी लगावला आहे.

भोंग्यांवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. राज्यातील भाजपचे राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे; पण भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमधील मशिदीवरील भोंगे उतरवा,” असे आवाहन आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी आज येथे केले.

महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच; परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत. रात्री १० ते सूर्योदयापर्यत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे”. उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती.

ई-श्रमकार्ड धारकांच्या बँक खात्यात दरमहा सहा हजार रूपये जमा करावेत. सर्व राज्ये तसेच केंद्र सरकार मिळून देशात रिक्त असलेल्या एक कोटी जागा त्वरित भरण्यात याव्या, आदी मागण्याही तोगडीया यांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!