Share

IPL 2022 DC vs MI : बुमराहच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज संथगतीने धावले, मुंबईला १५९ धावांचे लक्ष्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील ६९ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने मुंबई समोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात चाहत्यांना रोहित कडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

दिल्लीचा डाव

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. दिल्लीकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर लवकरच बाद झाला. त्याच्या लागोपाठ मिचेल मार्शही बाद झाला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ २४ धावा, रिषभ पंत ३९ धावा, सरफराज खान १० धावा, रोवमन पॉवेल ४३ धावा, अक्षर पटेल १९ धावांचे योगदान दिले. दिल्लीने ७ गडी गमावून २० षटकांत १५९ धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर रमनदीप सिंगने २ गडी बाद केले. डॅनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी १-१ एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, रितिक शोकीन, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ,सरफराज खान, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!