Share

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय जवानाला वीरमरण!

Published On: 

कुडाळ : सातारा जिल्ह्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत वीरमरण आले, ते तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झाले होते. शहीद प्रथमेश हे कुटुंबांचा एकमेव आधार असल्यामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़.

जवान प्रथमेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरेवाडी येथे झाले. उच्च प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणोली येथे तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल बामणोली येथे झाले. प्राथमिक शिक्षण घेत असताना देशसेवेची प्रथमेश यांना आवड होती. धाडसी आणि करारी असलेले प्रथमेश आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि परिस्थितीची जाणीव असणारे होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही.

१४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते. प्रथमेश यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. वडील संजय महादेव पवार, आई राजश्री, लहान भाऊ आदित्य असा त्यांचा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!