Share

अभिनेते मोहनलाल चित्रपटातूनच नाही तर व्यवसायातून देखील कमवतात करोडो रुपये

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेते मोहनलाल यांना साऊथचे सुपरस्टार म्हंटले जाते. मोहनलाल यांनी ४० वर्षाच्या अभिनयाच्या कारकीर्दीमध्ये ३४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामगिरी केली आहे. मोहनलाल यांचे जवळपास सर्व चित्रपट सुपरस्टार ठरले आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये येण्याच्या आगोदर मोहनलाल कुस्तीपटू होते. मोहनलाल हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील हे एक मोठ नाव आहे.

१९७८ साली मोहनलाल यांनी थिरानोत्तम या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. चित्रपटांव्यतिरिक्त ते त्यांच्या लग्झरी जीवनशैलीसाठी देखील ओळखले जातत. मोहनलाल यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने ते किती संपत्तीचे मालक आहेत आणि ते जीवन कशाप्रकारे जगतात हे जाणून घेऊया.

मोहनलाल यांच्याकडे ७.५ कोटींची सहा अलिशान वाहने आहेत. दुबईमधील बुर्ज खलिफा या ठिकाणी त्यांचा फ्लॅट आहे. २०११ साली त्यांनी हे घर घेतल होत. मोहनलाल यांचा रेस्टॉरंट आणि मसाल्यांच्या पॅकेजिंगचाही व्यवसाय आहे. त्यांना दक्षिणचा अंबानी असं देखील म्हणतात. यासोबतच ते मॅक्सलॅब सिनेमा आणि एंटरटेनमेंट या चित्रपट वितरण कंपनीचेही मालक आहेत. मोहनलाल एका चित्रपटासाठी ३.५ कोटी रुपये घेतात. माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती २१२ कोटी रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!