Share

VIDEO : फायर है मै..! IPL 2022पूर्वी डेल स्टेननं केलं ‘पुष्पा’ स्टाइल सेलिब्रेशन; तुम्हीच पाहा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. या नव्या पर्वासाठी सर्व फ्रेंचायझींचे खेळाडू मैदानावर खूप घाम गाळत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू सर्व चिंतांपासून मुक्त होऊन मजा-मस्करी करताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या मेगा लिलावात त्यांनी यंदाच्या हंगामासाठी एक मजबूत संघ निवडला.

स्पर्धेपूर्वीच्या फोटोशूटमध्ये हैदराबादच्या खेळाडूंनी चांगला वेळ घालवला. संघाने या फोटोशूटचा बिहाइंड द सीन व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केन विल्यमसन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, अभिषेक शर्मा, डेल स्टेन आणि राहुल त्रिपाठी यांच्यासह अनेक खेळाडू मजा करताना दिसत आहेत.

अभिषेक शर्मा, विल्यमसन, नटराजन आणि फिरकीपटू जगदीश सुचित काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनची स्टाइल कॉपी केली. या व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी, फलंदाजी प्रशिक्षक ब्रायन लारा हे देखील फोटोशूट करताना दिसले.

२०१६च्या विजेत्या हैदराबादसाठी शेवटचा हंगाम वाईट ठरला, या हंगामात ते पॉइंट टेबलच्या तळाशी होते. मात्र यंदा हैदराबाद संघ नव्या इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद त्यांच्या आयपीएल २०२२ मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!