Share

“तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात…”, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला होता. याची मुदत संपली असली तर यावरून  राज्यात राजकीय वातार्वरण चांगलेच तापले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही, अशी हुकुमशाही चालणार नाही. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या. कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत.” असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. कायद्याने हे सरकार चालते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. असेही अजित पवार म्हणाले आहेत.

अशा पद्धतीची विधाने करणे योग्य नाही. जो निर्णय ठरतो तो सर्वांना बंधनकारक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने २००५ मध्ये निर्णय दिला होता. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत त्यांनी परवानगी घ्यावीच, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहनही अजित पवारांनी यावेळी केले.

तसेच कायदा कुणी हातात घेण्याचा व तसं धाडस कुणी करु नये. न्यायालय जो निर्णय देईल त्याचे पालन करण्याचे सर्वांचे काम आहे. राज्यात रात्री दहाच्या पुढे हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ असे कार्यक्रम सुरू असतात. हे ग्रामीण भागात सुरू असते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करुन सगळ्यांनी सहकार्य करावे. सध्या काही ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. असेही अजित पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!