Share

IPL 2022 DC vs SRH : वॉर्नर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद! वाचा दोन्ही संघांची हेड-टू-हेड आकडेवारी

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी करत ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर आहे. जर सनरायझर्सने हा सामना जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेऊ शकतात.

या सामन्यात सर्वांच्या नजरा डेव्हिड वॉर्नरवर आहेत, जो पहिल्यांदा आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. या सामन्यात वॉर्नरला नक्कीच मोठी खेळी करायला आवडेल. जर आपण हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो तर, दोन्ही संघांमधील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा आहे. हैदराबादने ११ सामने जिंकले असून दिल्ली कॅपिटल्सने ९ सामने जिंकले आहेत.

ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून ४६६ धावा केल्या आहेत. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक ४८९ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने सनरायझर्सविरुद्ध १० विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादकडून १३ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!