Share

IPL 2022 : बाप शेर पोरगा सव्वाशेर..! रिकी पाँटिंगच्या मुलानं ऋषभ पंतला थकवलं; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ५०व्या सामन्यात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याच्या एक दिवस आधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत मस्तीच्या मूडमध्ये दिसला. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पंत संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा मुलगा फ्लेचरसोबत फुटबॉल खेळताना दिसला. पाँटिंग सध्या कुटुंबासह भारतात आहे.

आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंत आणि फ्लेचर फुटबॉल खेळत आहेत. फ्लेचर खूप चांगला फुटबॉल खेळत असल्याचे या व्हिडिओतून दिसून आले. दोघेही बराच वेळ मैदानात फुटबॉल खेळताना दिसले. मुख्य पाँटिंगच्या मुलाचे फुटबॉल कौशल्य पाहून पंत प्रभावित झाला.

डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने सध्याच्या आयपीएलच्या ९ सामन्यांमध्ये २३४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४४ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यादरम्यान त्याने २६ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत. या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंत सध्या २५व्या क्रमांकावर आहे. पंतला दिल्लीचा कर्णधार बनवण्यात रिकी पाँटिंगचा मोलाचा वाटा आहे. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर पंतला आयपीएलच्या १४व्या हंगामात कर्णधारपद देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!