🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना जे जे हॉस्पिटलमधून आर्थर रोड जेल मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना किडनीच्या आजारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर माहिती दिली आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल कण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली.
ईडीकडून नवाब मलिक यांच्या आरोग्यविषयीचा जे जे हॉस्पिटलचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार ते किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यांना जामीन मिळावा अशी विनंती न्यायालयात करण्यात आली, यावर न्यायालयाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज मालिकांच्या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकतो. दरम्यान वैद्यकीय जामीन आणि घरचे जेवण मिळावे, या दोन्ही अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची प्रकृती खालावली. प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना तुरुंगातून दवाखान्यात नेले होते. नवाब मलिक यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होत होती. त्यांनी विशेष न्यायालयात वैद्यकीय कारण दाखवून जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडीला नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आपलं म्हणणं दाखल करायचे होते. मात्र या दरम्यानच मलिक यांची प्रकृती खालावली होती.
महत्त्वाच्या बातम्या :


