मुंबई : परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत असतांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे वक्तव्य केले आहे. रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलत शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अर्जुन खोतकर म्हणाले की,‘सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच आहेत. तसेच नसत्या भानगडी सोडून द्या’, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
दरम्यान,‘नेतृत्व हे समाजाला एकसंघ ठेवणारं असलं पाहिजे. त्यामुळे ब्राम्हणाला मी केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहू इच्छित नाही. तर या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो’, असे रावसाहेब दानवे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- OBC Reservation : “…हा विरोधकांचा रडीचा डाव”, अजित पवारांनी सुनावले
- IPL 2022 CSK vs RCB : “मला वाटतं की…”, धोनीनं कोणावर फोडलं चेन्नईच्या पराभवाचं खापर? नक्की वाचा!
- “तृतीयपंथी पण मुख्यमंत्री…”, रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया!
- आज नवाब मलिक यांना जामीन मिळणार? किडनीच्या आजार झाल्याची वकिलांची माहिती
- “तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात…”, अजित पवारांचा अप्रत्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा


