Share

IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! चार पराभवानंतर CSKला मिळाली अजून एक ‘वाईट’ बातमी; वाचा झालं काय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएल २०२२मध्ये सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. लीगच्या १५व्या मोसमात आतापर्यंत चेन्नईने चारही सामने गमावले आहेत. पराभवाचे कारण काही प्रमाणात त्यांच्या वेगवान गोलंदाजांची कमकुवतता हे देखील आहे आणि अशा परिस्थितीत संघाला आपला स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरची उणीव भासत आहे. चेन्नईला आज १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध पाचवा सामना खेळायचा आहे. पण या सामन्यापूर्वीच चेन्नईसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला पुन्हा दुखापत झाली आहे आणि आता तो आयपीएल २०२२च्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. चहर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) असून दुखापतीतून सावरण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

रिपोर्टनुसार, दीपक चहर जेव्हा बंगळुरूमध्ये होता, तेव्हा त्याची पाठीची दुखापत पुन्हा बळावली आहे. या आठवड्याच्या शेवटी चहर चेन्नई संघात सहभागी होणार होता. पण आता दुखापतीची समस्या पुन्हा समोर आल्यानंतर तो संपूर्ण आयपीएल २०२२ मधून बाहेर जाऊ शकतो. आयपीएल २०२२च्या लिलावात चहरला १४ कोटींची बोली लागली होती. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या ६३ सामन्यात ५९ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!