मुंबई : आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी फक्त अकरा हजार रुपयांचा निधी जमा केली होता, असा दावा नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. फेसबुकद्वारे त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेला ५८ कोटींचा आरोप हा बोगस आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे.
किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत. परंतु ते समाजमाध्यमांद्वारे आपली बाजू मांडत आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात ते म्हणत होते की, राज्यपालांना मुंबईकरांकडून १४० कोटी रुपये जमवून देण्यास तयार आहोत. त्यातून आयएनएस विक्रांतसाठी संग्रहालय उभं करता येईल.
किरीट सोमय्या यांनी विक्रांतसाठी जमवलेला निधी भाजपला दिला,अशी माहिती त्यांच्या वकीलांनीं दिली होती. तो निधी नेमका किती होता याची माहिती मिळाली नव्हती. आता सोमय्या यांनीच हा निधी ११००० हजार रुपयांचा होता असा दावा केला आहे. १४० कोटी रुपये जमवू असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला होता. पण तो निधी ११००० रुपयांचा आहे, असा दावा केल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :


