Share

IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल डबल हेडरचा पहिला सामना हैदराबाद आणि चेन्नई (CSK vs SRH) या दाक्षिणात्य संघात मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आता पर्यंत या दोन्ही संघाची कामगिरी एक समान राहिली आहे. ज्यामुळे दोन्ही संघ आज स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज बद्दल सांगायचे तर रवींद्र जडेजाच्या (ravindra jadeja) कर्णधारपदाची सुरुवात पराभवाने झाली आहे. आता पर्यंत झालेल्या तीन सामन्यात चेन्नईला एकही विजय मिळवता आलेला नाही. चेन्नईच्या खेळाडूंची कामगिरी चांगली असूनही आतापर्यंत त्यांना सामना जिंकता आलेला नाही. तर चेन्नईसह गुणतालिकेच्या तळाशी असलेल्या हैदराबादची गोष्ट सुद्धा सारखीच आहे. आज भिडणारे दोन्ही संघ विजयाच्या उम्मेदीत मैदानावर उतरतील.

डॉ. डी वाय पाटील मैदानावर झालेल्या गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल आहे. या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे खूपच सोपे दिसते, त्यामुळे जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणे हा या खेळपट्टीवर योग्य निर्णय असेल. पहिल्या डावात फलंदाजी करणे दुस-या डावाच्या तुलनेत थोडे कठीण आहे, जेथे पहिल्या डावाची सरासरी १५७ धावा आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी थोडी सोपी दिसली. त्यामुळेच लक्ष्याचा पाठलाग करताना येथे ६० टक्के सामने जिंकले आहेत.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!