🕒 1 min read
बँगलोर : आयपीएल मेगा ऑक्शन सुरु होण्यापूर्वी प्री-आयपीएल ऑक्शन ब्रीफिंग आयोजित करण्यात आली आहे. जिथे केकेआरसाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने प्रथमच दिसली आहे. यावेळी किंग खान गैरहजर आहे, मात्र त्याचा मोठा मुलगा आर्यन खान सुद्धा सुहाना सोबत दिसला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आर्यन पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे तर सुहानाने कोरोनापासून वाचण्यासाठी केकेआरचा मास्क घातला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.आयपीएल ऑक्शन मध्ये सुहाना खान दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, आर्यन खानने मागच्या वर्षीही हजेरी लावली होती. गेल्या वर्षी आर्यन सह-मालक जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहतासोबत कार्यक्रमात दिसली होती. यावर जूही चावलाने आनंद व्यक्त केला होता आणि त्यावेळी ट्विटरवर दोघांचा फोटो शेअर केला आणि ज्यात लिहिले, ‘आर्यन आणि जान्हवी या दोन्ही मुलांना ऑक्शनटेबलवर पाहून खूप आनंद झाला.’
IPL मेगा ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे, ज्यामध्ये एकूण ५९०खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर IPL 2022 मेगा ऑक्शनचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स या ऑक्शनमध्ये चांगल्या खेळाडूंसोबतच कर्णधारच्या शोधात आहे. तसेच ड्रग्स वादानंतर आर्यनने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…भाजपचा हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला”, लतादीदी स्मारक वादावरून सचिन सावंतांचा आरोप
- “राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल
- “भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
- IPL 2022 MEGA AUCTION: जाणून घ्या, पहिल्या दिवशी कोणत्या प्लेयर्सचे ऑक्शन होणार!
- उदयनराजेंनी घेतली नारायण राणेंची भेट; केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
