Share

“राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कर्नाटक राज्यातील उडपी येथे काही शाळेत शिकणाऱ्या मुली धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू पाहत होत्या,परंतु उडपी मधील त्या शाळेच्या प्राचार्यांनी त्या मुलींना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून शाळेत प्रवेश करू दिला नव्हता. यावरून देशभर मोठ्या प्रमाणात वादंग उठला आहे. या वादाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले असून राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, गृहमंत्राच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गृहमंत्र्यांनी हे शहाणपण आधी हा मुद्दा तापवणाऱ्या आपल्याच पक्षाला सांगावे. हिजाबचे समर्थन करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबची परवानगी देणार आहे का? हेही राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारून घ्यावं’, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका.जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये.माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं.’ तसेच जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये, असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!