🕒 1 min read
नवी दिल्ली : खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosle) यांनी काल(११ फेब्रु.)विविध मागणींसह केंद्रिय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्ह्यातील व राज्यातील सुशिक्षित, कष्टकरी युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.
या भेटीसंदर्भात उदयनराजे यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’केंद्रिय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातुन, देशातील सुमारे ४५ टक्के आर्थिक उत्पन्न हे असंघटीत व लघू उद्योगातुन मिळते. मात्र कोविड-१९ मुळे देशातील विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. तरीही रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देणारे खाते आहे. त्यामुळे या खात्याच्या माध्यमातुन सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी लघुउद्योजकांना चालना देण्याची ग्वाही आम्ही देतो.’
केंद्रिय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातील व राज्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित, कष्टकरी युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा बाबतीत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी त्यांनी आम्हास आत्मचरित्राची प्रत दिली.@MeNarayanRane pic.twitter.com/79aRCs2IzK— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 11, 2022
पुढे ते म्हणाले की,’नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रशासनाच्या जास्तीत जास्त योजना सातारा जिल्ह्यात कशा आणता येतील यावर सविस्तर चर्चा झाली. या विभागाच्या माध्यमातुन साताऱ्यात सुशिक्षित बेरोजगार आणि होतकरु तरुण उद्योजकांसाठी लवकरच उद्योजक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येईल’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पारंपारिक हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्याकरीता केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु व्हावे तसेच केंद्रीय लघु व मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातुन छोटया उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. तो निधी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. तसेच या विभागाच्या माध्यमातुन सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योग उभारणी प्रोत्साहन देण्याचा आपला प्रयत्न राहील. देशातील सुमारे ४५ टक्के आर्थिक उत्पन्न असंघटीत व लघु उद्योगातुन मिळते. विशेषतः ग्रामीण व्यवसाय आणि कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्राने विविध योजना सुरु केल्या आहेत याचा जास्तीत जास्त लाभ सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील युवकांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील’, असेही उदयनराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- २००८ साली घडलेल्या ‘त्या’ घटनेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
- ‘पीए’नेच काढला काटा! जाणून घ्या बच्चू कडूंना अडचणीत आणणारे गोपाल तिरमारे कोण आहेत ?
- IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताकडून व्हाईट वॉश
- रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; रेल्वेची ही सेवा पुन्हा सुरु होणार !
- आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
