Share

“…भाजपचा हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला”, लतादीदी स्मारक वादावरून सचिन सावंतांचा आरोप

Published On: 

मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar memorial controversy)यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली. यावरून राज्यात राजकीय वाद पेटला असून दुसरीकडे कॉंग्रेसने या मागणीला विरोध केला आहे. यावरच कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी भाजपने लतादीदींच्या स्मारकाबाबत हीन राजकारण केले असल्याचा आरोप केला आहे.

“शिवाजी पार्क हे नाव १९२७ साली ब्रिटिशांनी मराठी माणसाच्या भावना लक्षात घेता शिवरायांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शिवरायांचे स्मारक म्हणून दिले आहे व शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. शिवरायांच्या स्मारकात दुसरे स्मारक कसे होईल? असा सवाल करत भाजपने लतादीदींच्या स्मारकाबाबत हीन राजकारण केले”, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच भाजपने शिवरायांबद्दलचा आकस अधोरेखित केला आहे. भाजप नेते राम कदम शिवाजी पार्कवर स्मारकाची मागणी करतात. तर  दुसरीकडे भाजपचेच प्रकाश बेलवाडे स्मारक नको म्हणून याचिका करतात. हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाविरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांना याचिका करावयाला सांगितले. असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!