Share

“भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई: देशात कर्नाटक हिजाब वाद चांगलाच गाजत आहे. हिजाबचे पडसाद महाराष्ट्र राज्यासह देशभरात उमटून येत आहे. हिजाब प्रकरण आता हिंदू-मुस्लीम वादापर्यंत येऊन ठेपले आहे. यावरूनच कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant allegations against BJP) भाजपवर गंभीर आरप केले आहेत.

सचिन सावंत यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Assam Chief Minister Himanta Biswa Sharma) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणत आहे की, कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल पुरावा हवा होता. मात्र आम्ही त्यांना तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा विचारला आहे का? जर आमच्या सैनिकांनी स्ट्राइक केल्याचे सांगितले असेल, तर तुम्हाला पुरावे मागण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला आहे. यावरूनच सचिन सावंत यांनी भाजपला निशाण्यावर धरले आहे.

“भाजप भारतीय राजकारणाला लागलेली वाळवी आहे. या देशात पराकोटीचा द्वेष, अशी गलिच्छ भाषा, धर्मांधता पसरवत आहेत. पालकांनो, ही भाषा आपली मुले शिकत आहेत. हातात पुस्तकांऐवजी दगड येत आहेत, तोंडांत पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून मुलींना छळत आहेत. हा द्वेष तुमच्या घरात तुम्हाला चालेल का?”, असा सवाल सचिन सावंत यांनी ट्वीट करत केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!