🕒 1 min read
मुंबई: १२ आणि १३ अशा दोन दिवसात बंगलोर येथे ऑक्शन होत आहे. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी किती जणांवर बोली लागणार याची यादी जाहीर झाली आहे. पहिल्या दिवशी १० खेळाडूंच्या मार्की सेटने सुरूवात होणार आहे. जो प्रत्येक फ्रँचायझी किंवा आयपीएल स्टेकहोल्डरच्या मते मोस्ट वाँटेड खेळाडूंचा सेट असेल.पहिल्या सेटमध्ये आर अश्विन, ट्रेंट बोल्ट , पॅट कमिन्स , क्विंटन डी कॉक, शिखर धवन , फाफ डुप्लेसिस , श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा , मोहम्मद शमी ,डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश असेणार आहे
पहिल्या दिवशी खेळाडूंच्या एका मार्की सेटने मेगा ऑक्शनची सुरुवात होणार आहे. याखेरीज खेळाडूंना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळ्या सेटमध्ये विभागण्यात आले आहे. मार्की सेटसह एकूण ६२ सेट्स आहेत.मार्की सेटमध्ये स्पेशलायझेशनवर आधारित कॅप्ड खेळाडूंची संपूर्ण फेरी असेल.ज्यात फलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक-फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज असे विभाग असतील.
तर दुसऱ्या दिवशी अन कॅप खेळाडू हे खेळाडूंचा शेवटचा सेट असेल. २०१८ मधील शेवटच्या मेगा ऑक्शनच्या विपरीत, आयपीएलने यावेळी राईट टू मॅच पर्याय न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्शनमध्ये सर्वात तरुण खेळाडू अफगाणिस्तानचा १७ वर्षीय नूर अहमद आहे. तर सर्वात वयस्कर खेळाडू टी-२० अनुभवी इम्रान ताहिर आहे. त्याचे वय ४३ आहे. आयपीएल मेगा ऑक्शन सकाळी १२ वाजता सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या
- “…हे किरीट सोमय्यांच्या लढ्याचे यश आहे”, अतुल भातखळकरांचा कॉंग्रेसला टोला
- IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताकडून व्हाईट वॉश
- ‘पीए’नेच काढला काटा! जाणून घ्या बच्चू कडूंना अडचणीत आणणारे गोपाल तिरमारे कोण आहेत ?
- २००८ साली घडलेल्या ‘त्या’ घटनेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
- आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
