मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कमेंटेटर आकाश चोप्रा त्याच्या स्पष्ट मतासाठी ओळखला जातो. अनेकदा तो कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया शेअर करत असतो. आजकाल, आयपीएल 2022 मध्ये खेळल्या जाणार्या लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये कॉमेंट्री करण्याबरोबरच, आकाश चोप्रा आपले मत सांगत आहे. अलीकडेच त्याने पंजाब किंग्ज संघातील कमकुवतपणा उघड करत एका खेळाडूवर निशाणा साधला आहे.
आकाश चोप्राने (Aakash chopra) पंजाब किंग्जच्या खेळाडूवर निशाणा साधत सांगितले, ‘PBKSची फलंदाजी खूप मजबूत आहे. पण, त्याच्या गोलंदाजीमुळे त्याला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. ओडियन स्मिथची (Odean smith) गोलंदाजी त्याच्यासाठी अडचणीची आहे. तो विकेट घेवो किंवा नाही तो चारमध्ये ४० धावा नक्की देतो, कधी-कधी तो ३ षटकांतही एवढ्या धावा उधळून टाकतो.”
ओडियनने आतापर्यंत IPL 2022 मध्ये १२. १४ च्या सर्वोच्च इकॉनॉमी रेटने फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्याने १ षटकात ३० धावा दिल्या होत्या. या षटकात त्याचाच देशबांधव आंद्रे रसेलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. अशा परिस्थितीत आकाश चोप्राने दिलेल्या या विधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : एक मॅच दोन रेकॉर्ड..! पंजाबविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार चमकला; ठोकलं दीडशतक!
- IPL 2022 : ऋषभ पंतने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ खास रेकॉर्ड, बनला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
- क्लास इज पर्मनंट..! IPL 2022 दरम्यान CSKच्या माजी खेळाडूनं इंग्लंडमध्ये ठोकलं शतक; पाहा VIDEO!
- IPL 2022 : CSKच्या ‘स्टार’ खेळाडूंची पुणेकरांना मराठीतून साद..! तुम्ही पाहिला का ‘तो’ VIDEO?
- IPL 2022 PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद सुसाट..! पंजाबला ७ गड्यांनी धूळ चारत ठोकला विजयी ‘चौकार’


