🕒 1 min read
नाशिक : महाराष्ट्राला पुरोगामी दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांचा आणि नेत्यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यापूर्व काळ असो वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, महाराष्ट्रात समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा तसेच महिला सबलीकरण यासाठी अनेक चळवळी राबवल्या गेल्या. मात्र, पुरोगामित्वाचा साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. यासाठी दगडांची चूल मांडली गेली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.
हात भाजला तर महिला चारित्र्यहीनआणि भाजला नाही तर चारित्र्य संपन्न असा चुकीचा समज या जातपंचायतींद्वारे लोकांमध्ये निर्माण केला गेला आहे. या घटनेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
‘जात पंचायतीने नाशिकमध्ये एका महिलेला उकळत्या तेलात हात घालण्याची शिक्षा दिली, जी निषेधार्थ बाब आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत सहभागी असलेल्या जात पंचायतीतील संबंधित व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
जात पंचायतीने नाशिकमध्ये एका महिलेला उकळत्या तेलात हात घालण्याची शिक्षा दिली, जी निषेधार्थ बाब आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत सहभागी असलेल्या जात पंचायतीतील संबंधित व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे. @CMOMaharashtra@BJP4Maharashtra pic.twitter.com/IKYRUPRaBw
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 21, 2021
अखेर ‘ती’ हरली !
या हतबल महिलेला उकळत्या तेलात नाईलाजाने हात घालावा लागला. आणि तेल अत्यंत गरम असल्याने स्वाभाविकपणे महिलेचा हात भाजला व उपस्थितांसह पतीने देखील तिला चारित्र्यहीन ठरवले. संतापजनक म्हणजे व्हायरल झालेला व्हिडीओ हा संबंधित महिलेच्या पतीनेच काढला आहे.
या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. यानंतर, समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी होत आहे. सदर व्हिडीओ हा नाशिक मधील असल्याचं समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रामदास आठवले घेणार बिग बी ‘अमिताभ बच्चन’ यांची भेट
- वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात भाजपने आंदोलन करावं – संजय राऊत
- मोदीसाहेब ‘मन की बात’ मध्ये गोड- गोड बोलतात पण काम काहीच करत नाहीत
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
