इंदापूर : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.
राज्यात देखील इंधनाच्या दरांनी नवे विक्रम केले असून सत्तेतील महाविकास आघाडीने इंधन दरवाढीचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. विविध प्रश्नांना घेऊन राज्यातील विरोधी पक्ष भाजप हा आक्रमक होत असतो. आता, महागाई व इंधन दरवाढीविरोधात देखील भाजपने आंदोलन करावं असा सल्ला शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
‘वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षानं आंदोलन करावं. महागाई आहे, त्यामुळे निदान महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने तरी आंदोलन करावं,’ असं खोचक भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे. एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूरला ते आले आहेत. यावेळी, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इंधन दरवाढीवर भाष्य करत भाजपला लक्ष्य केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राने पवारांना रिटायर्डच केले पण पंतप्रधानपदाची आस साहेबांना स्वस्थ कुठे बसू देते ?’
- पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा
- मोदीसाहेब ‘मन की बात’ मध्ये गोड- गोड बोलतात पण काम काहीच करत नाहीत
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

