Share

काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके

Published On: 

🕒 1 min read

रांची : मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. परंतु, शेतकरी विरोधी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. या आंदोलनाचं विरोधकांकडून समर्थन करण्यात आलं आहे. काँग्रेसनंदेखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलं आहे.

गुरूवारी झारखंडमधील सरायकेला-खरसावां जिल्ह्यात काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एका जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

ही रॅली ज्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती त्यापेक्षा वेगळ्याच कारणामुळे या रॅलीची आता चर्चा होऊ लागली आहे. या रॅलीत गर्दी जमवण्यासाठी एका डान्सरला बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या रॅलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मंचावर काही महिला आणि नेते बसलेले दिसत आहेत. त्यांच्या समोरच डान्सर लैला मै लैला या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. यादरम्यान, त्या ठिकाणी जमलेल्या काही कार्यकर्त्यांनीही या गाण्यावर ठेका धरला होता.

https://twitter.com/KunalSarangi/status/1363058678773899268?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1363058678773899268%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fbollywood-movie-song-laila-main-laila-dance-jharkhand-congress-jan-aakrosh-rally-stage-farmers-a720

झारखंड भाजपचे प्रवक्ते कुणाल सारंगी यांनी याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “इटलीच्या हवेतच डान्स आहे. हवा तर थांबवाल परंतु डान्स कसा थांबवाल? काँग्रेसचं शेतकऱ्यांबद्दलचं हे प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आले. १८ फेब्रुवारी रोजी सरायकेला खरसवां जिल्ह्यातील कुकडू प्रखंज येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश रॅलीचा नजारा,” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!