Share

एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकार आपल्या ताब्यातील संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट रचत आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या, याचे उत्तर केंद्राने द्यावे. एनसीबीचाही वापर केंद्र सरकार करत आहे. किरकोळ कारणांवरून बॉलीवूडला का बदनाम केले जात आहे? असे विविध सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अशाप्रकारे केंद्र सरकारवर निशाना साधला.

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर बोलण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, अशी टीका देखील केली. ते म्हणाले, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढला. मात्र, वाघ नामक व्यक्तीने या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिले. हा माणूस भाजपचा जळगाव जिल्हा सरचिटणीस असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा आहे. त्यामुळे भाजप ओबीसी आरक्षण विरोधात आहे.

शनिवारी सायंकाळी भुजबळ यांनी समता परिषदेचे अध्यक्ष मनोज घोडके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भुजबळ म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी मी आग्रही भूमिका घेतली. सरकारने दखल घेऊन अध्यादेश काढला. मात्र, काहीही झाले तरी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू नये, यासाठी भाजप कामाला लागला आहे. भुजबळ यांनी याचिककर्त्याचे सोशल मीडियावर प्रोफाइल देखील उपस्थितांना दाखवले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!