पुणे : गेल्या काही दिवसांपासून ईडीने सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाईचा भडगा उठवला आहे. या कारवाईमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भावना गवळी आणि प्रताप सरनाईक अशा काही नेत्यांची नावे आहेत. या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांकडूनही अनेक टीकात्मक वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या कारवाईवरुन टीका केली आहे.
विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीाच वापर केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो आणि जातो. काळ जाईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होतील. जिथे गैरव्यवहार झाला असेल, त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचं गृह खातं आहे. इथे तपासाची यंत्रणा असताना ईडीनं त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
‘याची अनेक उदाहरणं हल्ली ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असं पवार म्हणाले आहेत. ‘गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
‘कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी
- भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान, ब्रिटिशांनी आपसात गैरसमज निर्माण केले- मोहन भागवत
- त्याला का संधी दिली नाही?, विराटचं उत्तर ऐकून अश्विनसह अनेकांना बसेल धक्का
- ‘कोरोना चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल’
- ‘माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो’, मेहबूब शेख यांचा खोचक टोला


