Share

अंतरजिल्हा दुचाकी चोरी करणारी टोळी चिकलठाणा पोलिसांच्या जाळ्यात, १० दुचाकी जप्त

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : चिकलठाणा पोलीस ठाण्याअंतर्गत ई-पेट्रोलिंग करत असताना, निपानी फाट्यावर दुचाकी चोरून पळ काढत असलेल्या, चोरट्याला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत शुक्रवारी पकडले. चौकशी दरम्यान त्याने विविध ठिकाणाहून १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्याच्याकडून रविवारी १२ दुचाकी जप्त केल्या. तसेच त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

शहाजी सुधाकर कुरकुटे, तात्यासाहेब अशोक भालेकर, शाहरुख मुक्तार शेख सर्व रा. तीर्थपुरी ता. घनसावंगी, जि. जालना अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निपाणी फाट्याजवळ एक दुचाकी चोरीला गेल्याची माहिती ई-पेट्रोलिंग वर असलेल्या पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठत माहितीच्या आधारे त्या दुचाकीचा पाठलाग करत, कुरकुटे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच दोन साथीदारांसोबत मिळून वाहनचोरी करत असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी तीर्थपुरी येथे जावून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्या कडून ४ लाख ८३ हजार रुपयांच्या १० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच चिकलठाणा हद्दीतील ३, बिडकीन येथील १, अंबड येथील १, करमाड येथील १, असे सहा गुन्हे उघडकीस आणले. हि कामगिरी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि विश्वास पाटील यांच्या पथकाने केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!