पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार पुण्यात आज घडला आहे. किरीट सोमय्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते. दरम्यान किरीट सोमय्या पुण्यात येताच पुणे शहरातील शिवसैनिकांनी चांगलाच राडा घातला. यामध्ये किरीट सोमय्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. यामध्ये सोमय्या जखमी झाले असून ते शहरातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.”
नेमकं काय घडलं?
किरीट सोमय्या पुण्यात आल्यावर ते पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी पुणे महानगगरपालिका भवनात गेले असताना शहरातील हजारो शिवसैनिक आक्रमक झाले. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिका भवनात येणार हे कळताच शहरातील हजारो शिवसैनिक पुणे महानगरपालिका इमारतीच्या परिसरात जमले. यावेळी शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून गेले असता किरीट सोमय्या पुणे मनपा भवनाच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यांना किरकोळ जखमही झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील शिवसैनिकांचा हा राडा जवळपास ५ ते १० मिनिट सुरु होता.
महत्वाच्या बातम्या:
- “नं. १ सिएमच्या शहराला…”; अमृता फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रतिउत्तर
- हिवाळी ऑलिम्पिकला चीनची राजधानी बीजिंग मध्ये दिमाखदार सुरुवात
- आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत… नाना पटोले
- राज्यपालांनी विचारलेल्या झाडाचे नाव एकालाही सांगता आले नाही…
- “आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकतेय…”; चित्रा वाघ यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
