मुंबई : 23 मार्च रोजी कंगनाच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा अर्थात ‘थलायावी’चा ट्रेलर लाँच करण्यात आला. हा दिवस कंगनासाठी खास होता. कारण 23 मार्चला कंगना रनौतचा वाढदिवस होता. त्यामुळे हा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. कंगनाचा हा खास दिवस संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’ची टीम कसलीही कसर सोडली नाही.
चित्रपटाच्या प्रमोशनची प्रत्येक शैली स्वत:मध्येच खास असणार आहे. हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/tv/CMxbnrWH4_A/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, त्यानंतर कंगनानं एक प्रेस कॉन्सरन्स सुद्धा घेतली. यावेळी कंगनानं स्त्रियांच्या ताकदीवर भाष्य केलं. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिच्या एका वक्तव्यावरून तिनं पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावल्याचं बोललं जात आहे. कंगना नेहमीच आपल्या बिनधास्त व्यक्तव्यामुळे अडचणीत सापडते. मध्यंतरी कंगनचा शिवसेने सोबत राजकीय वाद चांगलाच पेटला होता.
कंगना प्रेस कॉन्सरन्स मध्ये म्हणाली कि, ‘गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्यासोबत अनेक गोष्टी घडल्या आणि आताही होतच आहेत. पण जो कोणी स्त्रीचा अपमान करतो त्याचा विनाश निश्चित असतो. इतिहास साक्ष आहे याला. रावणानं सीतेचा आणि कौरवांनी द्रौपदीचा अपमान केला आणि अखेर त्यांचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. मात्र, काहींनी कंगनाच्या या बोलण्याचा रोख शिवसेनेकडे असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता कंगना आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद रंगणार हे नक्कीच.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- ‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘भाई जगताप टपोरी आहेत.. त्यांना ‘भाई’ बनायचं होतं,पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

